पुणे : वाचन संस्कृती जोपासावी व ग्रामीण भागातील शाळेमधील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी पुणे शहरातील  सामाजिक संस्थेने  पुस्तकांची भेट दिली.
नवी पेठ येथील चिन्मय नर्सिंग होमच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ.राधा संगमनेरकर  यांच्या संस्थेमार्फत ही भेट देण्यात आली. पत्रकार रामदास वाडेकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम घडवून आला.
मावळ तालुक्यातील वरसुबाई माध्यमिक विद्यालय माळेगाव ,भैरवनाथ माध्यमिक विद्यालय बौर व नवमहाराष्ट्र विद्यालय रुपीनगर यांना अध्यक्ष डॉक्टर राधा संगमनेरकर यांच्यामार्फत पुस्तके देण्यात आली.
यावेळी नीला सरपोतदार ,छाया काळे ,रिता शितोले,विद्या कोल्हे  नीलिमा  भादबहादे ,रूचा सावरकर पुणे जिल्हा मुख्याध्यापक उपाध्यक्ष  राजेश गायकवाड  मुख्याध्यापक नामदेव गाभणे ,तुषार पवार ,संदीप वाकडे उपस्थित होते.

error: Content is protected !!