कार्ला : देवघर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुभाष ज्ञानदेव भानुसघरे  यांना’  महाराष्ट्ररत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. भानुसघरे यांना शैक्षणिक सामाजिक व आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रातील बहुमुल्य प्रेरणादायी अशा प्रबोधनाच्या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य विश्वनाथ फाउंडेशन व इनफोडॅडच्या संयुक्त विद्यमाने  महाराष्ट्ररत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.२८ फेब्रुवारीला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक पुणे येथे सकाळी अकरा वाजता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार ,आमदार सुनील शेळके व अनेक मंत्री महोदयांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे अशी माहिती फाउंडेशनचे सचिव अॅड शंकरराव चव्हाण यांनी दिली.
विशेष म्हणजे मावळ तालुक्यातुन प्रथमच हा पुरस्कार  जाहीर झाल्याबद्दल सरांचे शैक्षणिक सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक धार्मिक नाते वाईक मित्रमंडळी कडून सरांचे अभिनंदन होत आहे.भानुसघरे गुरूजी उत्कृष्ट निवेदक असून तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात त्यांचा सतत सहभाग असतो.

error: Content is protected !!