वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील पवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या १३ जागांसाठी ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले असून, २३ फेब्रुवारीला निवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजेश निखारे यांनी दिली.
पवन मावळातील सर्वात मोठ्या असलेल्या पवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या एकूण १३ जागांसाठी एकूण ६४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. ३२ जणांच्या अर्ज माघारीनंतर सोमवारी (दि. १०) निवडणूक रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार १३ जागांसाठी ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. त्यात सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधींच्या आठ जागांसाठी सर्वाधिक २१, महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी चार, अनुसूचित जाती व जमातीच्या एका जागेसाठी दोन, मागासवर्ग प्रतिनिधीच्या एका जागेसाठी तीन, भटक्या जाती जमाती / विशेष मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी दोन उमेदवारांचा समावेश आहे अशी माहिती निवडणूक अधिकारी निखारे यांनी दिली.
निवडणूक रिंगणातील उमेदवार पुढीलप्रमाणे
सर्वसाधारण : मारुती आडकर, भरत भोते, बबन दहिभाते, किसन घरदाळे, गणपत घारे, किसन काळे, लक्ष्मण काळे, रामजी काळे, धोंडू कालेकर, नामदेव कालेकर, रमेश माळवदकर, राम नढे, अंकुश पडवळ, विठ्ठल पवार, भाऊ सावंत, सूर्यकांत सोरटे, आनंदा तुपे, अनिल तुपे, बाळू वाघोले, किसन वाळुंज, लक्ष्मण येवले. महिला प्रतिनिधी : लक्ष्मीबाई आडकर, शैलजा दळवी, सुशीला घरदाळे, नर्मदा कडू, अनुसूचित जाती-जमाती: अंकुश सोनवणे, दत्तात्रय सोनवणे, इतर मागासवर्ग : भगवान आढाव, शेखर दळवी, वसंत गोसावी, भटक्या जमाती – विमुक्त जाती बाळू आखाडे, जयश्री पवार .

error: Content is protected !!