पिंपरी: लायन्स इंटरनॅशनल (प्रांत ३२३४ डी – २) यांच्या वतीने मोफत कृत्रिम पायरोपण (जयपूर फूट), स्वयंचलित हात आणि कुबड्या वाटप शिबिर निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात उत्साहात संपन्न झाले. प्रांतपाल लायन विजय सारडा, उपप्रांतपाल लायन राज मुछाल, माजी प्रांतपाल राजेश आगरवाल, उपप्रांतपाल लायन श्रेयस दीक्षित, उपप्रांतपाल लायन दिलीप सोनिगरा यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे ३१७ गरजू व्यक्तींनी शिबिराचा लाभ घेतला.
त्यामध्ये गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या लोकांचे विविध कारणांनी आणि अपघातात पाय गमावले आहेत, ज्या व्यक्तींचे कारखान्यात अथवा शेतात काम करताना कोपर्‍यापासून हात गमावले आहेत त्यांना सेन्सरसह मशीन ऑपरेटेड कृत्रिम हात, जयपूर फूट, कुबड्या यांचे वितरण करण्यात आले.
यासाठी शिबिराचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींच्या पायाचे आणि हाताचे मोजमाप करण्यासाठी पुणे शहर, पिंपरी – चिंचवड आणि लोणावळा येथील विविध केंद्रांवर लायन्स इंटरनॅशनलच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती.
शिबिराच्या संयोजनात लायन राजेंद्र काळे, लायन सुनील सुखात्मे, लायन नेमिचंद बोरा, लायन जयंता येवला,
लायन सतीश देशमुख  यांनी परिश्रम घेतले. शिबिरासाठी पनराज पुखराज सोनिगरा फाउंडेशन आणि प्रांतातील ३९ क्लब यांनी सहकार्य केले. रिजन चेअरमन लायन शैलजा सांगळे यांनी सूत्रसंचालन केले. लायन राजेंद्र काळे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!