
तळेगाव दाभाडे : येथील श्रीरंग कला निकेतनच्या रंगमंचावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखा आयोजित कै.पै.मोहन महादेव काकडे स्मरणार्थ कै.थोर साहित्यिक गो.नी.दांडेकर करंडक मराठी बालनाट्य स्पर्धा मंगळवार दिनांक ११ फेब्रुवारी व बुधवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होणार आहेत.
या स्पर्धा मावळ तालुका स्तरीय असून माध्यमिक व प्राथमिक गटात होणार असून रसिक प्रेक्षकांना अतिशय सुंदर बालनाट्य पहायला मिळणार आहेत.दोन्ही दिवस सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्पर्धा चालणार आहे.१२ तारखेला अतिशय भव्यदिव्य बक्षिस समारंभ आयोजित केला आहे.
सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे तरी तळेगाव शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्पर्धा प्रमुख भगवान शिंदे,नयना डोळस व नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी केले आहे.
- मावळ तालुक्याच्या विकास कामांसंदर्भात आमदार सुनील शेळके यांची पीएमआरडीए आयुक्तांसोबत बैठक
- वणवे व वन्यप्राण्यांसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती :वनविभाग शिरोता व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचा पुढाकार
- भामाबाई महादू सातकर यांचे निधन
- वडगाव मावळला उद्यापासून शिवजयंतीचे कार्यक्रम
- जागतिक महिला दिन व महाराष्ट्र लोकधारा न्यूज प्रथम वर्धापन दिनानिमित्त : क्राईम रिपोर्टर श्रावणी कामत यांना पुरस्कार सन्मान सोहळ्यासह रंगला खेळ पैठणीचा..! महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


