
- मावळ तालुक्याच्या विकास कामांसंदर्भात आमदार सुनील शेळके यांची पीएमआरडीए आयुक्तांसोबत बैठक
- वणवे व वन्यप्राण्यांसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती :वनविभाग शिरोता व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचा पुढाकार
- भामाबाई महादू सातकर यांचे निधन
- वडगाव मावळला उद्यापासून शिवजयंतीचे कार्यक्रम
- जागतिक महिला दिन व महाराष्ट्र लोकधारा न्यूज प्रथम वर्धापन दिनानिमित्त : क्राईम रिपोर्टर श्रावणी कामत यांना पुरस्कार सन्मान सोहळ्यासह रंगला खेळ पैठणीचा..! महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वडगाव मावळ: नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तसेच पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ” ऋणानुबंध – २०२४” माजी विद्यार्थी मेळावा नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यात २०१२ बॅच पासूनचे माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय (बाळा ) भेगडे, खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के,संस्थेचे विश्वस्त महेशभाई शहा, प्रमुख पाहुणे म्हणून नूतन अभियांत्रिकीची माजी विद्यार्थिनी सोनल आकाश शिंदे- खांदवे,सहाय्यक कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन, आकाश शिंदे, गटविकास अधिकारी महाराष्ट्र शासन , पीसीएटी – नूतनचे सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट चे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे, प्राचार्य डॉ. एस.एन. सपली, डॉ. अपर्णा पांडे, माजी विद्यार्थी समन्वयक प्रा. शंकरराव उगले आदी मान्यवर उपस्थित होते.
‘’सातत्याने स्वतःला स्पर्धात्मक आणि गुणात्मक बनवा. विविध प्रशिक्षणाद्वारे आधुनिक तंत्रज्ञान शिका, तसेच विद्यार्थी दशेत असताना शिस्तीचे पालन करून चांगले भविष्य घडवण्याचा प्रयत्न करा”, असे उदगार सोनल शिंदे यांनी बोलताना केले.
‘नूतन संस्थेत माजी विद्यार्थ्यांसाठी उद्योजगता समन्वयाचे विविध उपक्रम उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांची प्रगती ही संस्थेची अभिमानाची बाब आहे. संस्था कायमच तुमच्या यशासाठी सहकार्य करेल, तुमचे कौतुक करेल’ अशी भावना राजेश म्हस्के यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केली.
बाळा ( संजय ) भेगडे यांनी आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयाच्या प्रगती चा आढावा घेऊन माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले . तसेच माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील अनेक मनोरंजक किस्से सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन. सपली यांनी महाविद्यालयामधील विविध उपक्रमांची माहिती देऊन आगामी काळातील वाटचालीसाठी कल्पक योजना देखील मांडल्या.
औदयोगिक आस्थापना आणि शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वय निर्माण करण्याची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना औदयोगिक जगताशी जोडण्याचे काम नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी च्या सेंट्रल प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून केले जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात चांगली रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहोत असे मत रवंदळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवदत्त दिक्षित, अतुल्या मेरीजोस, नेहा सावकार यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. नीता कराडकर, प्रा. सोनाली डोंगरे, प्रा. स्पंदन वाघमारे, प्रा. शीतल जडे, प्रा. राहुल पाटील, प्रा. सत्यजित शिरसाट, प्रा. नूतन पाटील, प्रा. प्रतीक्षा तनपुरे तसेच सौरभ पाटेकर, आरुष कुकडे, आस्था भोले, ऋषिकेश शेंडगे, राहुल साळुंखे, अद्वैत देवगडे, रुद्रेश बिजवे या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोलाचे योगदान दिले.
- मावळ तालुक्याच्या विकास कामांसंदर्भात आमदार सुनील शेळके यांची पीएमआरडीए आयुक्तांसोबत बैठक
- वणवे व वन्यप्राण्यांसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती :वनविभाग शिरोता व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचा पुढाकार
- भामाबाई महादू सातकर यांचे निधन
- वडगाव मावळला उद्यापासून शिवजयंतीचे कार्यक्रम
- जागतिक महिला दिन व महाराष्ट्र लोकधारा न्यूज प्रथम वर्धापन दिनानिमित्त : क्राईम रिपोर्टर श्रावणी कामत यांना पुरस्कार सन्मान सोहळ्यासह रंगला खेळ पैठणीचा..! महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


