चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये वसंत पंचमीचा आनंदोत्सव
तळेगाव दाभाडे:इंदोरी ता. मावळ येथील चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये वसंत पंचमीचा सोहळा मोठया भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. ज्ञान आणि कला यांची अधिष्ठात्री देवी सरस्वती मातेचे विधिवत पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
विद्यार्थ्यांनी वसंत पंचमीचे महत्त्व विशद करत विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कृती सादर केल्या.प्राचार्या हेमलता खेडकर यांनी वसंत पंचमीच्या पारंपरिक आणि आधुनिक संदर्भांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना ज्ञानसाधनेचा वसा पुढे नेण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या निमित्ताने विद्यार्थ्यांनी काव्य, भजन आणि कला प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली सृजनशीलता व्यक्त केली. संपूर्ण शाळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून गेली होती.

error: Content is protected !!