
कामशेत: प्रियदर्शनी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक दिलीप टाटीया यांच्या पुण्यतिथी निमित्ताने माळेगाव येथील वरसुबाई माध्यमिक विद्यालयात ह.भ.प पांडुरंग महाराज (शास्री) गायकवाड यांची प्रवचन सेवा संपन्न झाली.
ह.भ.प.पाडुरंग महाराज यांनी विद्यार्थ्यांनी पंचसूत्री सांगितली. ज्यातून फलप्राप्ती निश्चित होईल असा विश्वास दिला.विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश गायकवाड यांनी विद्यालयाचा गुणवत्तेतील चढता आलेख व वार्षिक अहवाल सादर केला.
या वेळी विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्नेहभोजन नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संस्थेचे संस्थापक सचिव पोपट बाफना यांनी स्व. दिलीप टाटिया यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
- गुरूवारी समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा पारितोषिक वितरण सोहळा
- सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त कार्यक्षम महिलांचा प्रातिनिधिक सन्मान
- मनिषा सातपुते बेस्ट लाइफ कोच अवॉर्डने सन्मानित
- नूतन अभियांत्रिकीमध्ये महिला दिन उत्साहात साजरा
- बजरंग बलीचा प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा संपन्न : सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान” दुर्गसेवकांचा उपक्रम


