
वडगाव मावळ:’ या टेस्ट करा आवडल्यास इतरांना सांगा ‘ असे आवाहन करीत मावळच्या कसदार भूमीत अस्सल झणझणीत मटण व मासेंच्या थाळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवराज हॉटेलची आमदार थाळी येत आहे. मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते या थाळीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
रविवारी ता. ०९ ला दुपारी १२ वाजता आमदार शेळके यांच्या हस्ते या थाळीचे उद्घाटन होईल पुणे-मुंबई जुना हायवे, भेगडे लॉन्स समोर वडगाव, ता. मावळ जि. पुणे येथील शिवराज येथे आज पासून ही नवी थाळी खवय्यांसाठी उपलब्ध असणार आहे.
या थाळी बद्दल अधिक सांगताना शिवराजचे मालक अतुल वायकर म्हणाले, ‘हॉटेल शिवराज फॅमिली रेस्टॉरंट मध्ये व्हेज आणि नॉनव्हेज असे अस्सल मराठमोळ्या स्वादाची मेजवानी असते.
नव्याने झणझणीत अशी आमदार थाळी हॉटेल ग्राहकांच्या पसंतीस उतरणार आहे.हॉटेल व्यवसायामधे जागतिक विक्रम नोंदविल्या नंतर पुन्हा एकदा खास खवय्यांच्या आग्रहास्तव चटकदार आणि झणझणीत अशी आमदार थाळी आहे.आमदार थाळी ५ ते ६ जणांसाठी आहे.
यात मटन हंडी मटन बिर्याणी,चिकन हंडी,चिकन रान,गावरान हंडी ,अंडा बॉईल,बांगडा हंडी भाकरी,वजडी फ्राय, मांदेली फ्राय,बटर नान , रोटी,लॉलीपॉप,ग्रीन सॅलड,चिकन बिर्याणी रायता,चिकन कलेजी फ्राय असे आपल्या पसंतीचे ॲटम असणार आहे.
- गुरूवारी समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा पारितोषिक वितरण सोहळा
- सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त कार्यक्षम महिलांचा प्रातिनिधिक सन्मान
- मनिषा सातपुते बेस्ट लाइफ कोच अवॉर्डने सन्मानित
- नूतन अभियांत्रिकीमध्ये महिला दिन उत्साहात साजरा
- बजरंग बलीचा प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा संपन्न : सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान” दुर्गसेवकांचा उपक्रम


