वडगाव मावळ: तामिळनाडू येथील डायमंड राष्ट्रीय स्काऊट गाईड डायमंड जांबोरी येथे देशभरातून चार  आणि सत्तावस राज्यातून  शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.त्यात महाराष्ट्राने वीस पारितोषिके पटकावली.महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व पुणे जिल्ह्यातील सहा शाळांनी केले.त्यातील  सह्याद्री इंग्लिश स्कूल ही तळेगाव दाभाडे येथील आहे
या विद्यालयातील सहशिक्षिका यशश्री आलम यांच्या मार्गदर्शनात ऋतुजा सोनार, गौरी शिंदे, प्रांजल शेवाळे, विशाखा नाईक, गायत्री भेगडे,रुचिता जाधव,अपूर्वा सोनटक्के, प्रणिषा मनवर याविद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
  वेगवेगळ्या स्पर्धां मध्ये या मध्ये या विद्यार्थ्यिनीनी विजय नोंदवला. अँडवेन्चर अँक्टीविटी, ग्लोबल डेव्हलपमेंट विलेज, ईंटेग्रेटी अँक्टीव्हीटी ,फन गेम ई.मध्ये महाराष्र्टातील स्काऊट गाईडने कौशल्य दाखविले. या सोहळ्यातील महाराष्ट्र दिन सर्वाना भूरळ घालणारा ठरला.महाराष्र्ट राज्य हे सर्वच बाबतीत महान आहे हे पुन्हा एकदा महाराष्र्टाच्या स्काऊट गाईड व स्काऊटर गाईडर यानी सिध्द केले.
अकरा स्पर्धेत प्रथम क्रमाक, आठ स्पर्धेत द्वितीय तर एका स्पर्धेत तृतिय क्रमाकांचे पारितोषिक मिळवून महाराष्र्ट राज्याने तामिळनाडुत आपला ठसा उमठवला.मार्चपास्ट, ग्रँड कॅम्प फायर, कलरपार्टी, लोकनृत्य, रांगोळी, फुडप्लाजा, कँम्प क्राप्ट, ईथेनिक शो, पिजंट शो (शोभायाञा), फिजीकल डिस्पले, स्किल ओ रामा ह्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले. सह्याद्री स्कूल मधील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम अशी संधी मिळाल्याने आता कुठल्याही परिस्तिथीत घट्ट पाय रोवून उभे राहण्याचे बळ त्यांना या कार्यक्रमाने दिले. त्यांचे विशेष कौतुक होत आहे. मुख्याध्यापिका व संस्थापक सर्व सदस्य यांनी त्यांचे कौतुक केले.

error: Content is protected !!