तळेगाव दाभाडे:येथील संजीवनी मुलींच्या वस्तीगृहातील मुलींना खाऊ व फळे वाटप करत मुळचे लातुर येथील रहिवाशी असलेले कृष्णा बाबन्ना व शुभांगी बाबन्ना यांनी आपल्या मुलीचा तिसरा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
वस्तीगृहातील मुलींनी देखील आमच्यासोबत आपण आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला याचे समाधान आणि आनंद व्यक्त केला.कृष्णा बाबन्ना यांनी मुलगा व मुलगी हे सारखेच आहेत.असे मनोगत व्यक्त केले.तर ओवळे गावचे युवा नेते अजित शिंदे म्हणाले की,बाबन्ना कुटुबांप्रमाणेच समाजातील इतरांनी देखील मुलीच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे.
बाबन्ना कुटुबाने आपल्या मुलीचा वाढदिवस मुलींच्या वसतीगृहात साजरा करून त्या मुलींना देखील आपल्या आनंदात सहभागी करून घेतले आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत हे बाबन्ना कुटुबांनी जसे केले तसे केले पाहिजे.प्रत्येकाने बाबन्ना कुटुबांचा आदर्श घेतला पाहिजे.व मुलींच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम