इंदोरी : आमदार सुनिल अण्णा शेळके प्रस्तुत  मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित मावळ प्रीमियर लीग MPL 2025 स्पर्धेचा थरार क्रिकेटप्रेमींनी ‘ याच डोळी याच देही ‘अनुभवला. या स्पर्धेच्या फायनलचा सामना उत्साहात झाला.
हा सामना आमदार सुनील शेळके, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे,,राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष गणेश ढोरे,भाजपाचे माजी अध्यक्ष प्रशांत ढोरे ,भाजपाचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे, माजी सदस्य दीपक हुलावळे,सुनिल ढोरे ,पोलीस निरीक्षक रणजीत जाधव ,पोलीस निरीक्षक प्रशांत रेळेकर ,सरपंच शशिकांत शिंदे ,उपसरपंच संदीप ढोरे, मारूती देशमुख, बळीराम मराठे, प्रकाश हगवणे, योगेश काळोखे, देवा गायकवाड ,बाळासाहेब भानुसघरे, नथूभाऊ दाभाडे, दत्तात्रेय ढोरे,दिनेश चव्हाण,अँड. रविंद्र पेटकर, मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष मनोज दाभाडे, प्रविण शिंदे ,बाळा धामणकर, अमोल जाधव,तानाजी काकडे,गणेश वाल्मिकी यांच्या उपस्थितीत सामना पार पडला.
यंदाच्या एमपीएलचा विजेता संघ वडगाव मावळचा प्रशांतभाऊ म्हाळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन ठरला.रोख एक लाख रुपये व भव्य ट्रॉफी या संघानी पटकावली.अनुक्रमे राहुल भाऊ ताकभाते स्पोर्ट्स फाउंडेशन,राजुद्दीन शेख व स्वप्नील शेलार स्पोर्ट्स फाउंडेशन,स्वर्गीय प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थात हनुमान क्रीडा संघ माळीनगर देहुगाव हे उपविजेते संघ ठरले.
  मालिकावीरचा बहुमान निलेश ढगे यांनी पटकाविला.. बेस्ट फलंदाज स्वरांजल गायकवाड व बेस्ट गोलंदाज सतीश बधाले ठरले.क्रिकेट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल नथुभाऊ दाभाडे व निहाल तुसामद यांना  मावळ भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे  यावर्षी  नारी शक्ती थीमच्या माध्यमातून तालुक्यातील विविध क्रीडा क्षेत्रात लीडरशिप करणाऱ्या लेकींचा सत्कार करण्यात आला.साक्षी म्हाळस्कर (वेटलिफ्टिंग) ,सावरी सातकर (कुस्ती- प्रथम महिला मावळ केसरी),सिद्धी बाळकृष्ण लोणकर (क्रिकेट),सिद्धी दाभाडे (कुस्ती) ,सेजल मोईकर (वेटलिफ्टिंग),सई शिंदे (वेटलिफ्टिंग) ,वैष्णवी झेंडे (कब्बडी),वैष्णवी म्हाळसकर (क्रिकेट) या सर्व मुलींचा सन्मान करून मावळ प्रीमियर लीगची सांगता झाली.
आमदार सुनिल शेळके म्हणाले, ” मावळ प्रीमियर लीगचे नीटनेटके व देखणे आयोजन पहायला मिळाले. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच अद्यावत व सुसज्ज क्रिडागंणाची उभारणी करण्यात येईल.मावळ मातीत खेळाडूंवर उत्तमोत्तम पैलू पाडण्याचे काम केले जाईल.
प्रशांत भागवत (आयोजक) म्हणाले, ” कडजाई माता मैदानावर झालेल्या यंदाच्या स्पर्धा नव्या बदलाची नांदी ठरेल. आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या पुढाकाराने या मैदानावर सुसज्ज क्रिडागंण उभे राहील. यातून राज्य आणि देशाचे प्रतिनिधित्व करतील असे खेळाडू घडतील.

error: Content is protected !!