वडगाव मावळ: मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘ ७६ वा  प्रजासत्ताक दिन ’ उत्साहात साजरा. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पालकांची मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती होती.
मामासाहेब खांडगे  इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ७६ वा  प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुणे  शशिकांत  हळदे (प्रसिद्ध उद्योजक,संस्थापक अभिजित इंजिनीरिंग)  यांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आली. राष्ट्रगीत व ध्वजगीताने  झेंड्याला मानवंदना देण्यात आली.
यावेळी शाळेचे अध्यक्ष  गणेश खांडगे,उपाध्यक्ष  अविनाश पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाळेचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्यातर्फे करण्यात आला.  यानंतर शाळेतील सर्व हाऊस च्या विद्यार्थ्यांनी मानवंदना संचलन केले. इ. २ री च्या राघव पोतदार या विद्यार्थ्याने प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले विचार अतिशय सुरेख शब्दात व्यक्त केले.
शशिकांत  हळदे  यांनी सर्व विद्यार्थी व उपस्थित पालकवर्गाला मार्गदर्शन केले व प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. इ. ३ री ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी विविध कवायत प्रकारांचे प्रात्यक्षिक सादर केले. यामध्ये प्रामुख्याने  कवायत प्रकार,लाठी-काठी, कराटे, ननचाकू तसेच  मर्दानी खेळांमध्ये  तलवारबाजी,दांडपट्टा  यांसारख्या प्रात्यक्षिकांनी लक्ष वेधून घेतले. ह्या सर्व प्रात्यक्षिकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांनी केले होते. 
तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजयी ग्रीन  हाऊसच्या ट्रॉफी चे वितरण करण्यात आले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  स्वाती कांडेकर व रश्मी  दुबे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पालकवर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होता.    कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळा प्रशासन व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!