इंदोरी : आमदार सुनिल अण्णा शेळके प्रस्तुत मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित मावळ प्रीमियर लीग MPL 2025 स्पर्धेला मावळ तालुक्यातील रोटरीयननी हजेरी लावली.रोटरीयन्सच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाआरती घेण्यात आली.
रोटरी क्लब ऑफ मावळ, रोटरी क्लब ऑफ एमआयडीसी तळेगाव, रोटरी क्लब ऑफ तळेगाव, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी, या क्लब मधील सदस्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
अभिजीत इंजिनियरिंग चे सर्वेसर्वा प्रसिद्ध उद्योजक रोटरी क्लब ऑफ मावळच दादासाहेब उऱ्हे, रोटरी क्लब ऑफ एमआयडीसी संस्थापक अध्यक्ष तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, समाजभूषण धोंडीभाऊ घोजगे, पैसा फंड कारखाण्याचे MD रोटरी क्लब ऑफ मावळचे सचिव सुखेंदू कुलकर्णी ,अभिजीत इंजीनियरिंग चे सर्वेसर्वा प्रसिद्ध उद्योजक शशीकांत हळदे, रोटरी क्लब ऑफ मावळचे माजी अध्यक्ष दीपक चव्हाण, प्रसिद्ध उद्योजक संजय गायकवाड, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे सदस्य दीपक फल्ले, प्रगतशील शेतकरी प्रकाश घोजगे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ चव्हाण, रोटरी क्लब ऑफ तळेगावचे सचिव प्रमोद दाभाडे, रोटरी क्लब तळेगाव सदस्य प्रसिद्ध आर्किटेक श्री मेहन्ते, रोटरी क्लब ऑफ मावळचे माजी अध्यक्ष रविंद्र घारे, पैलवान अजित बावकर मावळ केसरी, दीपेश नाटक चेअरमन द MES एम्पलोयी co op क्रेडिट सोसायटी पुणे हे उपस्थित होते.
ह भ प धोंडिभाऊ घोजगे समाज भुषण आणि दादासाहेब उऱ्हे यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या प्रशांत दादा भागवत स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेचा थरार पहायला मिळतोय.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम