संग्राम जगताप मित्र परिवार व हरि ओम ग्रुपच्या वतीने आयोजन
तळेगाव स्टेशन : संग्राम जगताप मित्र परिवार व हरि ओम ग्रुपच्या वतीने शनिवार ता. २५ ला संध्याकाळी ६.०० ते ९.३० या वेळेत मकर संक्रांत सणानिमित्त हळदी-कुंक समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्त न्यू होम मिनिस्टर हा खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे.तसेच मावळ विधानसभा मतदारसंघातून मोठया मताधिक्याने विजय झाल्याबद्दल आमदार सुनील शेळके यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
सिनेनाट्य अभिनेत्री  ऐश्वर्या नारकर, गुरुवर्य हितेश वानखेडे यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हॉटेल ड्रीम लंच, नाना भालेराव कॉलनी, तळेगाव दाभाडे (स्टेशन) हा कार्यक्रम होणार आहे. राजेश बारणे प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाला लकी ड्रॉ कुपन व बक्षीसांची लुट करता येणार आहे.परिसरातील महिलांनी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन संगम जगताप व कल्याणी जगताप यांनी केले.
आमदार सुनिल सुनील  शेळके यांचा नाना भालेराव कॉलनी, सद‌गुरु कॉलनी, म्हाडा कॉलनी १ व २, दाभाडे वस्ती, हॅपी कॉलनी, श्रीरंग विहार, प्रतीक नगर, मानस नगरी, आयकॉनिक, तपोधाम कॉलनी येथील रहिवासी व संग्राम कृष्णराव जगताप मित्र परिवार आणि हरी ओम ग्रुपच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
संग्राम जगताप म्हणाले, ” या कार्यक्रमाचे आमंत्रण प्रत्यक्ष भेटून देण्याची मनापासून इच्छा होती. परंतु सर्वांच्याच व्यस्त जीवनशैलीमुळे ते शक्य नसल्याने  पत्र प्रपंचाद्वारे आपणांस आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.आपला स्नेह आहेच तो अधिक वृद्धिंगत व्हावा म्हणून या सोहळ्यत  नक्की भेटूयात.

error: Content is protected !!