वडगाव मावळ: टाकवे बुद्रुक येथील बाळराजे असवले इंग्लिश मीडियम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये राजमाता जिजाऊ जयंती तसेच स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.
   विद्यार्थिनी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा करून आल्या होत्या.विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला होता.विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांच्यावर मराठी तसेच इंग्रजी मधून भाषणे सादर केली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक राज कांबळे आणि उपमुख्याध्यापिका प्रियंका कुडे यांनी केले.
त्याचप्रमाणे स्कूलमध्ये मकर संक्रांत सेलिब्रेशन देखील करण्यात आले.सर्व मुलांना तिळगुळाच्या वड्याचे यांचे वाटप करण्यात आले.आणि मकर संक्रांतीचे महत्त्व पटवून दिले.पूजा कालेकर ,काजल वाडेकर , कांचन जाचक, ऐश्वर्या मालपोटे, नेहा असवले ,ऋतुजा धनाड , अमिता जोशी ,रूपाली जाधव ,सोनम शहा यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!