वडगाव मावळ: महिला बालकल्याण योजनेअंतर्गत एकात्मिक बाल विकास योजना पुणे यांच्या माध्यमातून शहरात महिला सक्षमीकरण व महिलांना रोजगार निर्मिती यासाठी पिंक (गुलाबी) रिक्षाचे स्वागत व जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके व मोरया प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी बालकल्याण प्रकल्प अधिकारी संध्या नगरकर, पर्यवेक्षिका संगीता ठाकूर, अंगणवाडी शिक्षिका कांचन ढोरे, प्रतिभा ढोरे, कल्पना ढोरे, हर्षा ओव्हाळ, चेतना ढोरे, अर्चना ढोरे, छाया धोंगडे, कमल शिंदे, सुमिता ढवळे, शालन कावडे, शकुंतला नागे मंदा चव्हाण इत्यादी अंगणवाडी शिक्षिका उपस्थित होत्या.
वडगाव शहरातील २० ते ४० वयोगटातील महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी पिंक रिक्षा घेण्यासंदर्भात मोरया प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा पुणे, सोमवार पेठ जाधव बिल्डिंग येथे पिंक रिक्षाचे फॉर्म उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच बँकेमार्फत अर्थसहाय्य करून देण्यासाठी सहकार्य करण्यात येत आहे. तसेच येणाऱ्या काळात महिला रिक्षा व्यवसायासाठी स्वतंत्र रिक्षा स्टॅन्ड लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार अशी माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अबोली ढोरे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई रिक्षा योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. या याजनेसाठी लाभार्थ्यांना आवश्यक असणारी पात्रता खालीलप्रमाणे.लाभार्थींचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील.अर्जदाराचे वय २० ते ४० वषें असणे अनिवार्य आहेसदर याजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणा-या लाभार्थ्यांचे बॅंक खाते असणे आवश्यक आहे.लाभाथीं कुटंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु ३ लाखापेक्षा जास्त नसावे.विधवा, कायदयाने घटस्फोटीत, राज्यगृहामचीलइच्छुक प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल.तसेच दारिद्रय रेषेखालील महिलांना सुध्दा प्राधान्य मिळणार आहे.
योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अर्जासोबत लाभार्थ्यांचे आधार कार्ड व पॅनकार्ड,महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किवा महाराष्ट्रातील जन्म दाखला किवा १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड / मतदान कार्ड / शाळा सोडलेचे प्रमाणपत्र,कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न
रु ३ लाखापेक्षा कमी.) किंवा पिवळे/ केसरी रेशनकार्ड,बॅंक खाते पासबुक,पासपोर्ट आकाराचा फोटो,मतदार आळखपत्र (१८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर,मतदार यादीत नाव असल्याचा दाखला,रेशनकार्ड,सदर रिक्षा ही लाभार्थी महिलाच चालविणार
असल्याचे हमीपत्र,सदर याजनेच्या अटीशर्तीचे पालन करण्याबाबतच हमीपत्र,कर्जबाजारी नसल्याचे हमीपत्र, योजनेचे अर्ज मोरया प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयात उपलब्ध असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांनी वरिल कागदपत्रांची लवकरात लवकर पूर्तता करावी असे आवाहन मोरया प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अबोली ढोरे यांनी केले आहे.