तळेगाव दाभाडे:आमदार सुनिल शेळके प्रस्तुत मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित MPL 202 मावळ प्रिमियर लीग२२/०१/२०२५ ते २६/०१/२०२५या कालावधीत होणार आहे. या प्रीमियर लीगमध्ये खेळाडू, क्रिकेट प्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत भागवत यांनी केले आहे.
मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन व प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट्स फाउंडेशन इंदोरी यांच्या पुढाकाराने ही प्रीमियर लीग होणार आहे. कडजाई माता क्रीडांगण इंदोरी, मावळ होणा-या या स्पर्धेचे हे सातवे पर्व आहे. प्रथम क्रमांकास १,००,०००/- चषक,द्वितिय क्रमांकास ७१,०००/- चषक,तृतिय क्रमांकास ५१,०००/- चषक,चतुर्थ क्रमांकास ५१,०००/- चषक अशी बक्षीसे आहे. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण असणार आहे. उत्कृष्ट फलंदाजाला २१,००० रु व चषक,उत्कृष्ट गोलंदाजीला २१,०००रु व चषक,मालिकावीराला ३१,००० रु व चषक अशी बक्षीसे देण्यात येणार आहे.
आयोजक प्रशांत भागवत म्हणाले, “तरुणांमध्ये खेळाची आवड वाढावी,ती टिकावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिंकण्यासाठी खेळाडू खेळतील. पण त्यापूर्वी सरावासाठी गावोगावी मैदानावर खेळाडू खेळतील. ज्यामुळे सुदृढ पिढी घडेल.