लोणावळा : मावळ तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार विशाल यशवंत विकारी यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व पत्रकार हल्ला कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला.
पत्रकार दिनाचे औचित्य साधत ग.दी. माडगूळकर सभागृह निगडी येथे उपस्थित मान्यवरांचे हस्ते हा पुरस्कार विकारी यांना देण्यात आला.गेली वीस वर्षे पत्रकार क्षेत्रात विकारी हे कार्यरत असून एका साप्ताहिकाच्या माद्यमातून पत्रकारितेला सुरुवात करत समाजातील अनेक प्रश्नांना त्यांनी आपल्या लेखणीद्वारे वाचा फोडत त्यांनी अनेक नामांकित वृत्तपत्राचे निर्भीड पत्रकार म्हणून काम केले आहे या कामाची पावती म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

error: Content is protected !!