तळेगाव दाभाडे :पुणे मुंबई महामार्गाच्या लगत असलेल्या जीनियस क्रिकेट अकॅडमी ला तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सदिच्छा भेट दिली व अकॅडमी मध्ये सुरू असलेल्या क्रिकेट प्रशिक्षणाची माहिती घेतली
      तळेगावातील खळदे मळ्याजवळील जीनियस क्रिकेट अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष सुहास गरुड यांनी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांचे स्वागत केले व अकॅडमी मध्ये क्रिकेट खेळा बाबत सुरू असलेल्या प्रशिक्षणाची माहिती दिली
‌.   पुणे मुंबई महामार्ग लगत जीनियस क्रिकेट अकॅडमी ही क्रिकेटचे प्रशिक्षण देणारी क्रीडा संस्था असून या संस्थेत सुमारे २२० खेळाडू हे प्रशिक्षण घेत आहे त्यामध्ये सुमारे 20 ते 25 मुली दररोज सकाळ संध्याकाळ सराव करतात त्यासाठी अकॅडमीच्या वतीने नऊ तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव घेतला जात असतो
         तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांचा यावेळी संस्थापक अध्यक्ष सुहास गरुड यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी अकॅडमीचे सचिव ज्ञानेश्वर बोर हाडे संदीप पानसरे अविनाश पाटील निलेश थोरात निलेश खळदे अतुल ढोरे मनोज आगळे कुणाला आगळे आदी मान्यवर उपस्थित होते
       या अकॅडमी मध्ये मावळ तालुक्यातील तळेगाव पंचक्रोशी तसेच देहूरोड पिंपरी चिंचवड या ठिकाणाहून खेळाडू प्रशिक्षणासाठी येत असतात .
        अकॅडमीच्या पाहणीनंतर मुख्याधिकारी श्री सरनाईक यांनी तळेगाव नगरपरिषदेच्या हद्दीतील खेळाडूंसाठी शासनाच्या उपक्रमांचा लाभ करून देण्यात असल्याचे सांगितले तर तळेगाव शहरात विविध खेळाची मैदानी व खेळाडू यांच्यासाठी विशेष नियोजन करणार असल्याचेही यावेळी सांगितले श्री सुहास गरुड यांनी आभार मानले.

error: Content is protected !!