कामशेत: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची कृषी क्षेत्राकडे वाटचाल सुरू आहे.  फ्युचर एग्रीकल्चर लीडर्स ऑफ इंडिया व SBI फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या आवारात आधुनिक  असे  शेडनेट उभारले आहे.
चार गुंठेच्या शेड मध्ये फळभाज्यांची लागवड होईल.टाटा मोटर्स चिखली येथील कर्मचारी व अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमासाठी टाटा मोटर्सच्या  शितल जगताप ,मिलिंद जोशी, शाळा समितीचे सदस्य धनंजयजी वाडेकर ,  विक्रम  बाफना , उद्योजक  नवनाथ ठाकर ,शाळेच्या मुख्याध्यापिका  अनिता देवरे , माध्यमिक विभागाचे प्रभारी मुख्याध्यापक  तुकाराम पवार तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, टाटा मोटर्सचे कर्मचारी आणि विद्यार्थीनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
तुकाराम पवार यांनी स्वागत केले.प्रास्ताविक राजेंद्र  जगताप यांनी केले .शाळा समितीचे सदस्य  धनंजय वाडेकर यांनी पुढील पाच वर्षांमध्ये शाळेचे गुणवत्तेच्या  संदर्भातील  माहिती दिली . टाटा मोटर्स CSR नियोजनप्रमुख  मंगेश जोशी यांनी टाटा उद्योग समूहाबद्दल सविस्तर माहिती दिली.
शितल जगताप यांनी शालेय आठवणींना उजाळा देत मुलींना आत्मविश्वासाने जीवनात यश कसे मिळवावे याचे मार्गदर्शन केले. प्रेरणा साळुंखे  यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थित सर्वांना रोपांविषयी  गांडूळ खतांविषयी, शेती करण्याच्या संदर्भातील सखोल असे मार्गदर्शन केले . सूत्रसंचालन शाळेतील शिक्ष अजित डुंबरे  यांनी केले.

error: Content is protected !!