देहू : जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भंडारा डोंगरावरील त्यांच्या पादुका हेलिकॉफ्टरने संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र बोटा येथे रविवारी (ता.२२) नेण्यात येणार आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. प्रशांतमहाराज संभाजी मोरे (देहूकर)  आणि  सरपंच  जालिंदर गागरे यांना या  कार्याचे यजमानपद प्राप्त झाले आहे.भंडारा डोंगर येथून सकाळी अकरा वाजता या  पादुका कोरेगाव पार्क येथील हेलिपॅडवर पोहचतील.
तेथून दुपारी एक वाजता पादुका हेलिकॉप्टर मधून  श्रीक्षेत्र बोटा ( संगमनेर)येथे मार्गस्थ होतील. दरम्यान हेलिकॉप्टर मधून या प्रवासात मार्गात येणाऱ्या आळे फाटा, जुन्नर येथील रेडा समाधी मंदिरावर  तसेच संगमनेर तालुक्यातील आई कळमजाईमाता मंदिर, ,मळगंगामाता मंदिर ,म्हसवंडी,रामदासबाबा मंदिर बेलापुर,भोजामाता मंदिर भोजदरी, खंडोबा मंदिर वनकुटे,हनुमान मंदिर कोठे खुर्द, हनुमानमंदिर जवळेबाळेश्वर,कळमजाईमाता महालवाडी,श्रीखंडोबामंदिर सावरगाव घुले,श्रीक्षेत्र बाळेश्वरशिखरमंदिर शिवमंदिर पोखरीबाळेश्वर,कानिफनाथ मंदिर तळे वाडी,बिरोबामहाराज मंदिर साकुर,भगवतीमातामंदिर नांदुर, विठ्ठलमंदिर येठेवाडी ,खंद्रेश्वर, मंदिर खंदरमाळवाडी,काळभैरवनाथ डोळासणे,म्हसोबा मंदिर वरुडी,गोपालकृष्ण सारोळे,काळभैरवनाथ माळेगांव,शनैश्वर मंदिर आंबीखालसा, हनुमान मंदिर तांगडी, खंडोबामंदिर कोठे बुद्रुक,सावताबाबा बोरबन, महादेव मंदिर घारगाव,बोलआईमंदिर कुरकुंडी,मुक्ताईमाता मंदिर बोटा हनुमानश्रीकृष्ण आभाळवाडी भागाईमाता मुंजेवाडी,श्री दत्तमंदिर अकलापुर ,महालक्ष्मीमंदिर केळेवाडी,हनुमान मंदिर आळेखिंड,श्रीकृष्ण मंदिर माळवाडी ,श्रीरोकडेश्वर मंदिर आंबीदुमाला,श्रीराममंदिर कुरकुटवाडी या मंदिरांवर देखील पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!