कुसवली: साठीच्या पुढे असलेल्या त्या साऱ्यांनी आपला संपूर्ण दिवस सहारा वृद्धाश्रमात घालवत निराधारांना खाऊ-पिऊ घालत तसेच श्रमदान करत व्यतीत केला. चिंचवड गावातील ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर मिरजकर यांनी हा उपक्रम आयोजित केला होता. मंडळाचे ३० जण यामध्ये सहभागी झाले होते.
आंदर मावळातील कुसवली या गावात असलेल्या सहारा वृद्धाश्रमातील निराधार आजी आजोबांसाठी या मंडळींनी खाद्यपदार्थ बनवून आणले होते. तसेच बिस्किटे, मिठाई, फळे, पुस्तके, कपडे आदी वस्तू प्रत्येकाने आजी आजोबांसाठी आणल्या होत्या. या सर्वांनी  त्यांच्याबरोबर एकत्र भोजन घेतले.                                         त्यानंतर हास्य विनोद, गाणी, अनुभव कथन, आणि उतार वयातील व्यथा एकमेकांशी सर्वांनी शेअर केल्या. त्यानंतर वृद्धाश्रमाचा परिसर स्वच्छ करत, भांडी घासणे, झाडू मारणे आदी कामे करत एका वेगळ्या प्रकारे आयुष्यातील एक दिवस या सर्वांनी घालविला.
           वृद्धाश्रमाची संचालक विजय जगताप यांनी सर्वांचे स्वागत केले. या उपक्रमात शहाजी कांबळे, राजेश डावरे, शामकांत खटावकर, सुभाष नार्वेकर, जगदीश मुंदडा, रवींद्र रुकारी, रमेश पाटील, सुरेश लुनिया, सांबाजी वाठारकर, सुर्यवंशी आदींनी या अनोख्या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता.

error: Content is protected !!