वडगाव मावळ – कंपनीत अडचणच्या ठिकाणी अडकलेल्या सांबराची सुखरुप सुटका करण्यात आली.वनविभाग वडगाव आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थे यांच्या कडून हे प्रयत्न झाले.
आशिष कंपनी वडगाव फाटा इथे एक सांबर कंपनीच्या आवारात अडकलेची माहिती अनिकेत काळोखे यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना दिली. तसे लगेच निलेश गराडे, जिगर सोलंकी, सार्जेश पाटील, रोहित पवार, गणेश ढोरे, निनाद काकडे, अनिश गराडे घटनास्थळी पोहोचले, तिथे एक नर सांबर अडचणच्या ठिकाणी एका दोरीत अडकले दिसले.
वडगाव वनविभाग यांचे वनरक्षक पी. कासोले, य. कोकाटे, एस, मोरे व इतर टीम यांनी खूप परिश्रमा नंतर त्याला सुखरुप बाहेर काढून प्राथमिक तपासणी केली आणि जास्त जखमी नसता त्याला लगेच वनपरिक्षेत्रात मुक्त करण्यात आले. या वेळीस भीम सिंह सोनार, प्रेम सिंह सोनार व इतर कंपनी चे कर्मचारी यांनी पण खूप मदत केली.
कोणता ही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळून आल्यास जवळ पास च्या प्राणीमित्र ला किंवा वनविभागला संपर्क (१९२६) करावा असे आव्हान वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे संस्थापक निलेश गराडे ९८२२५५५००४ आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी लोकांना केले आहे.

error: Content is protected !!