तळेगाव दाभाडे :येथील संजीवनी मुलींचे वसतीगृहातील मुलींना छत्रपती शिवाजी महाराज व श्री.म्हसोबा मंदिराच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त ओवळे गावातील श्री.म्हसोबा मित्र मंडळाच्या वतीने फळे व खाऊवाटप करण्यात आला.
यावेळी ओवळे गावचे युवा उद्योजक अक्षय भालेराव, श्री.म्हसोबा मित्र मंडळाचे संस्थापक- अजित शिंदे व संजीवनी मुलींच्या वसतीगृहाच्या संचालिका-आसावरी बुधवर  व मुलीं उपस्थित होत्या.
यावेळी मुलींनी खुप शिकावे व मोठे व्हावे.व देवांने जे आपल्याला दिले आहे.त्यातील थोडेसे इतरांना देण्याचा प्रयत्न करावा.असे मत अजित शिंदे यांनी व्यक्त केले आसावरी बुधवर  यांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल श्री.म्हसोबा मित्र मंडळाचे आभार मानले.

error: Content is protected !!