कार्ला येथे लोणावळा बीट स्तरीय कला व क्रिडा महोत्सव उत्साहात संपन्न
विद्यार्थांंच्या कला गुणांना मिळाला वाव
तालुकास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थी व शाळांची झाली निवड
कार्ला – पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शालेय स्तरावर विद्यार्थांंच्या कला गुणांना वाव मिळावा ह्या हेतूने यशवंतराव चव्हाण कला व क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून विविध स्तरानुसार ह्या स्पर्धा होत असून मावळ पंचायत समिती व लोणावळा बीट स्तरावरील कला महोत्सव कार्ला प्राथमिक शाळा व क्रिडा महोत्सव एकविरा विद्या मंदिर शाळेत उत्साहात संपन्न झाला.
या क्रिडा महोत्सवाचे उदघाटन मावळ पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज,विस्तार अधिकारी नानासाहेब शेळकंदे,लोणावळा बीट मधील केंद्रप्रमुख सुहास विटे,मुकूंद तनपुरे,अमोल चव्हाण ,प्राचार्य संजय वंजारे,मुख्याध्यापक सुभाष भानुसघरे,तृप्ती गाडीलकर,संजय जगताप ,संजय हुलावळे यांंच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी वेहरगाव,कुसगाव,भाजे केंद्रातील केंद्रस्तरावर विजयी झालेले इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थांनी सहभाग नोंदवला.
यामध्ये सांघिक लोकनृत्य ,भजन,प्रश्न मंजुषा कविता पाठांतर,लंगडी,बडबड गीते तर वैयक्तिक धावणे,बुध्दीबळ,वक्तृत्व,वेशभुषा,,उंचउडी,गोळा फेक,लांब उडी,थाळी फेक अशा इयत्ता गटानुसार स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये लोकनृत्य स्पर्धेत डोंगरगाव व औढै प्राथमिक शाळा तर भजन स्पर्धेत ताजे प्राथमिक प्रश्नमंजुषा स्पर्धेत वेहरगाव व भाजे प्राथमिक तर लंगडी स्पर्धेत पिंपळोली व ताजे प्राथमिक ,कविता गायन औंढोली ,वेहरगाव प्राथमिक ,बडबड गीत शिलाटणे प्राथमिक या सर्व प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांक मिळवले.
तर वैयक्तिक स्पर्धेत देखील विद्यार्थांंनी यश मिळवलेल्या विद्यार्थांंची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सर्व क्रमांक मिळालेल्या विद्यार्थांंचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके देऊन सन्मान करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देवघर शाळेचे मुख्याध्यापक सुभाष भानुसघरे यांनी केले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस