तळेगाव दाभाडे: मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पूर्वप्राथमिक,प्राथमिक,माध्यमिक विभागाचे ‘वार्षिक स्नेहसंमेलन’ उत्साहात पार पडले. भारतातील चैतन्यमय जीवनातील विविधता या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते.
भारत हा देश विविध संस्कृती आणि परंपरांनी नटलेला आहे. भारतात विविध सण गुण्या गोविंदाने साजरे केले जातात .येथे जात-पात, लिंग, धर्म अशा कोणत्याच प्रकारचा भेदभाव केला जात नाही. अशाच संस्कृती आणि परंपरांचे दर्शन विद्यार्थ्यांना या स्न्हेसंमेलनाच्या माध्यमातून करून देण्यात आले.
यावेळी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे ए. के . मुल्ला (पोलीस निरीक्षक) तसेच सन्माननीय उपस्थिती अशोक देशमुख (प्रसिद्ध वक्ते आणि मार्गदर्शक, रामराव जगदाळे(अध्यक्ष महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघटना ) यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी संतोष खांडगे (सचिव नूमवि प्रसारक मंडळ) ,नंदकुमार शेलार (सहसचिव नूमवि प्रसारक मंडळ), सोनबा गोपाळे गुरुजी, शाळेचे अध्यक्ष गणेश खांडगे,उपाध्यक्ष अविनाश पाटील, आदित्य खांडगे, सत्यम खांडगे , सुनील वाळुंज, सुहास गरुड ,अनुपमा खांडगे,प्रथमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेचे उपाध्यक्ष अविनाश पाटील यांनी स्वागत केले. अध्यक्ष गणेश खांडगे यांनी प्रास्ताविक केले. सर्व मान्यवरांना शोभेची रोपे देऊन सत्कार करण्यात आला. शाळेचे मुखपत्र ‘मॅक्स व्हॉईस'(सन-२०२४-२०२५) याचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर सन (२०२३-२४) ह्या वर्षी शाळेच्या १० वी च्या विद्यार्थ्यांनी सलग सहाव्या वर्षीही १००% निकालाची परंपरा कायम ठेवली. यशस्वी विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
यामध्ये प्रथम क्रमांक सार्थक भांडवलकर,द्वितीय-यश साळवी, तृतीय प्रियल जिंदल,चतुर्थ शिवराज जगदाळे ,पाचवा क्रमांक यश म्हाळसकर या विद्यार्थ्यांचे सन्मान करण्यात आला. त्यानंतर (सन-२०२४-२०२५) नू.म.वि. प्रसारक मंडळ ट्रस्ट च्या वतीने विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये प्राथमिक विभागातून अवनी पांडे, श्रीनिधी पाटील व माध्यमिक विभागातून अमन रघुवंशी, रिद्धी ढाकोळ या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ए. के . मुल्ला (पोलीस निरीक्षक) यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांना मार्गदर्शन केले व शाळेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अशोक देशमुख यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना शिस्त लावणे किती महत्वाचे आहे आणि पालक यामध्ये मोठी भूमिका बजावतात त्यामुळे आपल्या मुलांना आधुनिक जीवनशैली मधून सुद्धा उत्तम संस्कार कसे रुजविता येतील याविषयी विनोदी पद्धतीने मार्गदर्शन केले.शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी शाळेच्या वार्षिक अहवालाचे वाचन करून वर्षभरातील विविध उपक्रमांचा आढावा सादर केला.
इ.नर्सरी ते इ. २ री च्या विद्यार्थ्यांनी ‘आनंदी जीवन’ ह्या संकल्पनेवर अतिशय निरागसतेने नृत्याविष्कार सादर केले. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी गणेशवंदना सादर करून कार्यक्रमाची सुरवात केली या मध्ये गणेशाचे थाटामाटात केलेले आगमन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. त्यानंतर इ. ३ री ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी भारतातील विशेष आकर्षणांवरील अत्यंत समर्पक अश्या गाण्यांवर नृत्य सादरीकरण केले. इ. ९वी १० वी च्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती व भारतीय संविधानाला मानवंदना देत मानवीय अधिकारांचे सादरीकरण नृत्याविष्कारद्वारे सादर केले.आपल्या संस्कृतीचा वारसा जपता यावा म्हणून शाळा नेहमीच प्रयत्नशील असते.यावेळी पालकवर्ग देखील मोठया संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैताली ठाकूर, साईशा रासने,केतकी जाधव,कु.हर्शल बोके ,शौनक जाधव,पूनम आंबेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळा प्रशासन व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस