इंदोरी: ज्ञान प्रबोधिनी निगडी व चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (CBSE) इंदोरी यांच्या संयुक्त विद्यमाने इ. पाचवीचे निवासी शिबिर  चैतन्य इंटरनॅशनल स्कूल(CBSE) इंदोरी येथे आयोजित करण्यात आलेले होते.
या शिबिरात  ४०  मुली, ४७  मुले व चैतन्य विद्यालयाचे ४ मुली, ५ मुले असे एकूण ९६ विद्यार्थी आणि ४ अध्यापक सहभागी होते.पार्श्व प्रज्ञालय तळेगाव येथे पार्श्वनाथांचे, वर्धमान महावीर स्वामींचे दर्शन घेऊन, पार्श्व प्रज्ञालयाचा इतिहास जाणून घेतला व संत तुकाराम साखर कारखाना पाहून सर्व विद्यार्थी व अध्यापक चैतन्य इंटरनॅशनल स्कूल, (CBSE) इंदोरी मध्ये पोहोचले.
अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे. सर्व व्यवस्थांनी सुसज्ज अशी इमारत आहे. चैतन्य गगनगिरी महाराजांच्या स्मृतींनी पावन झालेला परिसर आहे. सर्व विद्यार्थ्यांनी चैतन्य विद्यालयात असलेल्या शैक्षणिक बाबींची जसे की कम्प्युटर लॅब, लायब्ररी, वर्गखोल्या, विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
त्यानंतर विद्यालयाचा परिसर फिरून पाहिला. परिसरात लावलेले वृक्ष, गोपालन, मैदान, शेती इत्यादी बद्दल माहिती जाणून घेतली. विद्यालयाच्या प्राचार्या सौ हेमलता खेडकर यांनी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.
त्यानंतर सर्व विद्यार्थीना  विद्यालयाच्या प्राचार्या सौ हेमलता खेडकर यांनी  दत्त जयंतीच्या निमिताने औदुंबराचे  व  दत्तजयंतीचे महत्व सांगितले. दीप प्रज्वलन करून आरती करण्यात आली. यावेळी चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (CBSE) विद्यालयाचे संस्थापक  भगवान शेवकर  यांनी शाळा सुरू होण्यापूर्वीची पार्श्वभूमी आणि होत गेलेला उत्कर्ष विद्यार्थ्यांच्या समोर मांडला. तसेच विद्यालयाचे उद्दिष्ट, विद्यालयात सुरू असलेले मनुष्य घडणीचे प्रयत्न आणि मनुष्य जीवन कशासाठी यासंबंधी विद्यार्थ्यांच्या समोर मांडणी केली.
रात्री सर्व विद्यार्थी व अध्यापक यांनी चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये शेकोटीचा आनंद घेतला.  दुसऱ्या दिवशी  सर्व विद्यार्थ्यांनी कान्हेवाडी या आदर्श गावास भेट दिली त्यानंतर  इंद्रायणी नदीवर असलेल्या रांजणखळग्यांचे निरीक्षण करण्यासाठी आले. रांजणखळगे नेमके कसे तयार होतात त्याबद्दलची माहिती जाणून घेऊन विद्यार्थ्यांनी रांजणखळग्यांचे निरीक्षण केले.
त्यानंतर सिमेंट व दगडाची पावडर यांपासून विटा बनवण्याचा कारखाना विद्यार्थ्यांनी पाहिला. भुईमुगाची शेती, स्ट्रॉबेरीची शेती विद्यार्थ्यांनी पाहिली. स्ट्रॉबेरीची रोपे कशी असतात कशी लावली जातात त्यास खते व पाणी कसे दिले जाते स्ट्रॉबेरी झाडाला येती कशी इत्यादी बाबी विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या. त्यानंतर कुक्कुटपालन, शेळीपालन व वीटभट्टी बद्दलची माहिती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निरीक्षण करत, प्रश्न विचारत जाणून घेतली.
विद्यालयात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी मावळत्या सूर्यनारायणाचे दर्शन घेत सूर्यास्त अनुभवला. सर्वजण पद्य म्हणत व घोषणा देत परतीच्या प्रवासाला लागले. प्रार्थना घेऊन या शिबिराचा शेवट झाला.विविध गोष्टींचा अनुभव घेतल्याने विद्यार्थी पालकांशी भरभरून बोलत होते. चैतन्य विद्यालयात भगवान शेवकर यांच्या नियोजनात झालेली व्यवस्था उत्तम होती.
शिबिरात सहभागी सर्वच अध्यापकांच्या सहकार्याने आणि उत्साही विद्यार्थ्यांच्या सहभागाने हे शिबिर अतिशय यशस्वी झालेले आहे.या शिबिराचे शिबिर प्रमुख म्हणून  समाधान सुसर आणि सहाय्यक प्रमुख  बबीता आंबेकर यांनी काम पाहिले.

error: Content is protected !!