नातेसंबंध जपण्यातील अपयश हिच वृद्धाश्रमाची वाट असणं हे चिंताजनक- कवी म. भा. चव्हाण
टाकवे बुद्रुक : अलिकडच्या काळात कुटुंब संस्था व नाते संबंधामध्ये निर्माण झालेली दरी चिंताजनक बाब असून वृद्धाश्रमांची गरज त्यामुळे निर्माण झाली असल्याची भावना प्रसिद्ध कवी म. भा. चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केली.
आंदर मावळमधील कुसवली येथील सहारा वृद्धाश्रमात आयोजित करण्यात आलेल्या” आयुष्यावर बोलू काही” या कविता व जीवनविषयक भावविश्व उलगडणाऱ्या मुक्त संवाद मैफिलीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, भारुडकार-नाटककार कवी परशुराम वाघचौरे, कवी श्रीधर पाटील, दिलीप विधाटे, बालाजी थोरात, कवयित्री प्रीती सोनवणे, रूपाली भालेराव ,गुणवंत कामगार कवी सुभाष चव्हाण यामध्ये सहभागी झाले होते.
यावेळी कवी म.भा. चव्हाण पुढे म्हणाले की,” आई-वडिलांची सेवा करणे म्हणजेच आपल्या संस्कृतीला जतन करण्यासारखे आहे. सहारा वृद्धाश्रम म्हणजे आपलेपणाचा व करुणेचा ओलावा निर्माण करणारे माणुसकीचा झरा आहे. आयुष्याच्या सांजवेळी आधारा देणार हे सहारा केंद्र आहे.”
विविध अनुभवांची मांडणी करत हा कार्यक्रम मान्यवरांनी आपल्या अनुभवातून फुलवला. तीन तास चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये वृद्धाश्रमातील सर्व आजी-आजोबा यांनी समाधान व्यक्त केले. सहारा वृद्धाश्रमातील कुसुम सोनवणे व गणपत शिंदे या आजी आजोबांनी आपल्या आयुष्यातील वृद्धाश्रमा पर्यंतचा प्रवास उलगडून सांगितल्याने सर्वांना गहिवरून आले.
कार्यक्रमाचे संयोजन नक्षत्राचं देणं काव्यमंच संस्थेचे प्रा. राजेंद्र सोनवणे व सहारा वृद्धाश्रमाचे संचालक विजय जगताप यांनी केले .
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस