वडगाव मावळ :-मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थांनच्या वतीने येथे श्री दत्त जयंती जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री स्वामी सेवा केंद्र ( दिंडोरी प्रणित) यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या गुरुचरित्र पारायण सोहळ्यत शेकडो सेवेक-यांनी सेवा बजावली. श्री दत्त जयंती जन्म उत्सवाचे दिवशी देवस्थान संस्थान विश्वस्त मंडळ यांचे शुभहस्ते अभिषेक संपन्न झाला. काकडा आरती भजनी मंडळ यांचा सामुदायिक भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला, व संध्याकाळी पाच ते सात श्री दत्त जन्मावरील कीर्तन सेवा ह भ प गहिनीनाथ महाराज खेडकर,बीड यांची संपन्न झाली.
आठ दिवसीय कार्यक्रमाने गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले.या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन देवस्थान चे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेश ढोरे, विश्वस्त अनंता कुडे, चंद्रकांत ढोरे,अशोक ढमाले, तुकाराम काटे,अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे,सुभाष जाधव ,भास्करराव म्हाळसकर, सुनिता कुडे व पुजारी बाळासाहेब व मधुकर गुरव व स्वामी सेवा केंद्र प्रमुख गणेश लष्करी व सर्व सेवेकरी आणि ग्रामस्थांनी केले,
माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांनी परिवाराचे वतीने श्री दत्त महाराज यांचे चरणी चांदीची छत्री अर्पण केली.महाप्रसाद उद्योजक दत्तात्रय कुडे आणि परिवाराचे वतीने करण्यात आले होते. श्री दत्त मंदिरावर आकर्षण विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
- ब्राम्हणोली व वारु गावातील ग्रामस्थांसाठी रोटरी क्लब आयोजित मोफत आरोग्य शिबिर
- भारतीय कालगणना विज्ञान आधारित – डॉ. अजय अपामार्जने
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे