लोणावळा: येथील अॅड .बापूसाहेब भोंडे हायस्कूल येथे विज्ञान,चित्रकला ,इतिहास ,संगणक या विषयांवरील विविध मॉडेल व चित्रांचे तसेच विज्ञान विषयक रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आले होते.
नारायण भार्गव ग्रुपचे सर्वेसर्वा नारायण भार्गव, विद्यानिकेतन ट्रस्टचे अध्यक्ष अॅड माधवराव भोंडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी संस्थेच्या सचिव राधिका भोंडे,कल्पना चावला, स्पेस अकॅडमीचे डॉ.संजय पुजारी ,माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी थत्ते ,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजुम शेख,उपमुख्याध्यापिका तृप्ती गव्हले ,स्मिता इंगळे ,पर्यवेक्षिका स्मिता वेदपाठक ,शशिकला तिकोणे उपस्थित होते.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील चित्रे, मॉडेल किल्यांच्या प्रतिकृती विज्ञानचे वेगवेगळे प्रयोगचे मॉडेल कॉम्पुटर व गणित विषयांचे मॉडेल तयार केले होते.विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाबरोबरच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी अशाप्रकारे विविध विषयांच्या प्रदर्शनाचे आयोजन विद्यालयात केले जात असते. पालकांनी आपल्या पाल्याला प्रोत्साहन देऊन आशा प्रदर्शनात सहभागी होण्यास सांगितले पाहिजे असे संस्थेच्या सचिव राधिका भोंडे यांनी यावेळी सांगितले .
नारायण भार्गव व अॅड माधवराव भोंडे यांनी अनेक प्रतिकृती आणि चित्रांची प्रशंसा करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.विद्यालयच्या कला, विज्ञान, इतिहास, गणित आणि कम्पुटर विभागाच्या शिक्षकांनी यासाठी अथक प्रयत्न केले.