फाली उपक्रम अंतर्गत शैक्षणिक सहल
कामशेत: Fali (फ्युचर एग्रीकल्चर लीडर्स ऑफ इंडिया) हा उपक्रम कामशेत मधील महर्षी कर्वे आश्रम शाळा कामशेत येथे चालू आहे. या उपक्रमांतर्गत कृषी विषयाबद्दल शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. ही सहल आयोजित करण्यासाठी फाली आणि SBI फाउंडेशन यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
शैक्षणिक सहल कृषी विद्यालय पुणे, आंतरराष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती या सहली अंतर्गत विद्यार्थ्यांना कमीत कमी वयात खूप काही नवनवीन गोष्टी शिकायला आणि पाहायला मिळाल्या. जसे की टिशू कल्चर टेक्निक, द्राक्षांच्या बागा, आळंबी उत्पादन केंद्र, गांडूळ खत प्रकल्प, उच्च तंत्रज्ञान पुष्प व भाजीपाला उत्पादन प्रकल्प, केंद्रीय कृषी मोसम वेधशाळा, मृदा विज्ञान विभाग, जिवाणू खते, इत्यादी. तेथील शास्त्रज्ञ व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले.
या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली त्यामुळे शाळेचे विद्यार्थी तसेच शाळेचे शिक्षक खूप आनंदी आणि समाधानी होते. विद्यार्थ्यांनी या अप्रतिम सहलीसाठी SBI फाउंडेशन आणि फाली यांचे मनापासून आभार मानले.

error: Content is protected !!