
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील सोमाटणे येथील सुपुत्र डॉ.पद्मवीर भगवानराव थोरात यांची ‘महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट अ’ पदी नुकतीच निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य IBPS मंडळाद्वारे ही परीक्षा घेण्यात आली होती, त्या परीक्षेत प्राविण्य मिळवत डॉ थोरात यांनी हे यश मिळवले आहे. निवडीनंतर डॉ. थोरात यांना पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून पोस्टिंग देण्यात आली आहे. थोरात यांच्या निवडी नंतर सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून संघर्ष करून डॉ.पद्मवीर थोरात यांनी हे यश मिळवले आहे. डॉ.थोरात यांनी बीएएमएस, एमडी आयुर्वेद, एमबीए शिक्षण पूर्ण केले आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सोमाटणे गाव येथे तर माध्यमिक शिक्षण श्री तुळजाभवानी विद्यालय सोमाटणे, उच्चमाध्यमिक शिक्षण वाडिया कॉलेज पुणे येथे तर वैद्यकीय पदवी पदव्युत्तर पदवी शिक्षण डॉ.डी वाय पाटील कॉलेज पिंपरी येथे झाले आहे.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सध्या ते एप्रिल २०१३ पासून ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ कान्हे येथे आरबीएसके कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.
- वडगाव मावळला उद्यापासून शिवजयंतीचे कार्यक्रम
- जागतिक महिला दिन व महाराष्ट्र लोकधारा न्यूज प्रथम वर्धापन दिनानिमित्त : क्राईम रिपोर्टर श्रावणी कामत यांना पुरस्कार सन्मान सोहळ्यासह रंगला खेळ पैठणीचा..! महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- गुरूवारी समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा पारितोषिक वितरण सोहळा
- सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त कार्यक्षम महिलांचा प्रातिनिधिक सन्मान
- मनिषा सातपुते बेस्ट लाइफ कोच अवॉर्डने सन्मानित




