तळेगाव दाभाडे:
मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दि. २ ऑक्टोबर २०२४ रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी आजूबाजूच्या शालेय परिसरातील स्वच्छता करून श्रमदान केले. यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित होते.
याचबरोबर महात्मा गांधी जयंती साजरी करताना प्रतिमापूजन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची माहिती देण्यात आली. गांधीजींच्या सत्य, अहिंसा, सत्याग्रह या त्रिसूत्रीचा प्रत्यक्ष जीवनात आपण वापर केला पाहिजे. त्यांनी दिलेला लढा हा केवळ इतिहास नसून एक जीवन आहे. गांधीजींच्या विचारांमधून महिलांना सर्व क्षेत्रात समान संधीच्या वाटा निर्माण झाल्या. गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू मांडले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळा प्रशासन व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!