कामशेत: विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्राकडे करिअर म्हणून पहावे   असा सल्ला कृषी पर्यवेक्षक नवीनचंद्र बोऱ्हाडे यांनी दिला.येथील महर्षी कर्वे आश्रमशाळेत झालेल्या व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका देवरे होत्या. स्वागत कृषी शिक्षक प्रेरणा साळुंखे यांनी केले.
बो-हाडे म्हणाले,”विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती आहे.त्यामुळे प्रत्यक्ष शेती किंवा प्रात्यक्षिक करत या क्षेत्रातील ज्ञानामध्ये भर पडण्यास मदत होत आहे. बो-हाडे यांनी पीक उत्पादन व व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, माती परीक्षण, एकत्रित शेती पद्धत, पिकासाठी पोषक घटक व कमतरता याविषयी सखोल मार्गदर्शन केले. व्याख्यानासाठी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.
भारत कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो देशातील युवा पिढीने शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून शेती क्षेत्राकडे आकर्षित व्हावे. तसेच पारंपारिक शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी त्याची सुरुवात शालेय विद्यार्थ्यांपासून व्हावी यासाठी फाली (फ्युचर एग्रीकल्चर लीडर्स ऑफ इंडिया) या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राचे धडे दिले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याने कृषी क्षेत्राकडे करिअरची संधी म्हणून पहा असे ते म्हणाले.

error: Content is protected !!