पवनानगर :   पवना धरणग्रस्त ४ एकर जमीन देऊन पुनर्वसन करावे या मागणीवर ठाम आहे. दोन एकरचा निर्णय अमान्य असल्याचे शेतक-यांच्या वतीने सांगण्यात आले. पवनानगर येथील बैठकीत पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे पदाधिकारी व धरणग्रस्त शेतकरी यांच्या उपस्थितीत हीएकमुखी मागणी करण्यात आली आहे
पवना धरणग्रस्तांना शासनाकडून पुनर्वसन म्हणून २ एकर पवना धरण परिसरात व २ एकर जमीन जिल्हात देण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन मा. जिल्हाधिकारी कार्यालयात ता. १९/०५/२०२३ रोजी झालेल्या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला या बैठकीचे इतिवृत्त धरणग्रस्तांना दिले होते .
त्यानंतर पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दि. १२/०६/२०२४ रोजी झालेल्या बैठकीत धरणग्रस्तांना पवना धरण परिसरात दोन एकर  व पुणे जिल्ह्यात दोन एकर याप्रमाणे प्रती खातेदारांना  ४ एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु या बैठकीचे इतिवृत्त मागविले असता धरणग्रस्तांना केवळ दोन एकरच जमीन देण्याचा उल्लेख या इतिवृत्तात केल्याचे दिसून आले.
गेल्या दोन महिन्यात इतिवृत्त बदलून न आल्याने तसेच आजमितीस शासन दरबारी प्रती खातेदार दोन एकर जमीन देण्याचा निर्णय झाल्याची बातमी आल्यानंतर धरणग्रस्त पदाधिकारी व धरणग्रस्त खातेदार यांनी ठरल्याप्रमाणे  चार एकर प्रमाणेच पुनर्वसन व्हावे तसेच यादी दुरुस्ती करणे तसेच इतर तांत्रिक अडचणी सोडवुन परिपूर्ण प्रक्रिया करुन कोणत्याही खातेदारावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन पारदर्शक पध्दतीने या निर्णयाची अंमलबजावणी करावी यासाठी अजुन कालावधी गेला.
तरी चालेल परंतु  पुनर्वसनातील त्रुटी दूर केल्यानंतर प्रति खातेदार चार एकर प्रमाणे वाटप करावे या मागणीवर ठाम असल्याचे जाहीर केले तसेच प्रशासनाने धरणग्रस्तांना विचारात न घेता परस्पर दोन एकर क्षेत्र देणेचा घेतलेला निर्णय अमान्य असल्याचे सांगून आमदार सुनील आण्णा शेळके यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर माहिती देऊन चार एकर प्रमाणे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेणार असाल तरच पुनर्वसन करावे अन्यथा आम्हाला दोन एकर प्रमाणे वाटप मान्य नसल्याचे सर्वानुमते सांगितले आहे.
या बैठकीला पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे अध्यक्ष नारायण बोडके, उपाध्यक्ष राम कालेकर , रविकांत रसाळ, बाळासाहेब मोहोळ, सचिव बाळासाहेब काळे,किसन घरदाळे , लक्ष्मण भालेराव,दशरथ शिर्के, अँड संजय खैरे,दत्तात्रय ठाकर,संतोष कडू,संजय मोहोळ, मारुती दळवी,भाऊ दळवी,रवि ठाकर,संतोष भिकोले, यांच्यासह माता भगिनी व प्रमुख धरणग्रस्त उपस्थित होते
या बैठकीनंतर सर्व पदाधिकारी यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांना भेटून ४ एकर प्रमाणे वाटप करावे अन्यथा दोन एकर वाटप मान्य नाही धरणग्रस्तांची ठाम भूमिका असल्याचे कळविले आहे.याबाबत  बैठकीची इतिवृत्त बदलून घेण्याचे आश्वासन धरणग्रस्त पदाधिकाऱ्यांना दिले.

error: Content is protected !!