तळेगाव दाभाडे :तळेगाव दाभाडे येथील डॉ. डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस वराळे या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नुकताच संपन्न झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाचा परिचय, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०: स्वरूप,संधी आणि आव्हाने, अभियांत्रिकी अभ्यासक्रम या बाबत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुनील भिरुड ( कुलगुरू, सी ओ इ पी टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी पुणे ), सन्माननीय अतिथी डॉ. प्रमोद पाटील (अधिष्ठाता, सायन्स अँड टेक्नॉलॉजी शाखा, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार अभियांत्रिकी शिक्षणाची माहिती दिली आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. सुशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना महाविद्यालयाच्या सुविधांची माहिती दिली. प्राचार्य डॉ. सुरेश शिरबहादुरकर यांनी दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबर विविध तांत्रिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन कसे होणार आहे, याची माहिती दिली.
“विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासावरच नाही तर व्यावहारिक ज्ञान आणि विविध कौशल्यांच्या विकासावर भर द्यावा”, असे मत प्राचार्यानी यावेळी मांडले. कार्यक्रमाचे नियोजन विभाग प्रमुख प्रा. अभिजीत शिंदे व प्रा. प्रफुल कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.महेश पवार यांनी केले आणि आभार प्रदर्शन शैक्षणीक अधिष्ठाता, डॉ. योगेश गुरव यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाने झाला. नवीन विद्यार्थी या स्वागत समारंभाने अत्यंत प्रेरित झाले आणि त्यांनी भविष्यातील शैक्षणिक प्रवासाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम