पिंपरी: पिंपरी – चिंचवड न्यायालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका न्यायालय आणि पुणे जिल्हा विधी प्रधिकरण तसेच पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये पिंपरी, नेहरूनगर न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. गजभिये, अल अमुदी, व्ही. एन. गायकवाड आणि व आकुर्डी न्यायालयात व्ही. एस. डामरे यांनी आणि त्यांच्या समवेत पॅनल जज्ज म्हणून ॲड. मोनिका गाढवे, ॲड. वैभव कल्याणकर, ॲड. तमन्ना रोहरा, ॲड. दिव्या संहिता यांनी कामकाज पाहिले.
कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन आणि पाहुण्यांचे स्वागत करून झाली. कार्यक्रमात प्रमुख वक्ते यांची भाषणे झालीत. त्यामध्ये न्यायालयाचे न्यायाधीश एन. आर. गजभिये यांनी लोक अदालतबाबत मार्गदर्शन केले. लोकन्यायालयाचे महत्त्व, त्याची स्थापना आणि भविष्यातील त्याचे महत्त्व पटवून सांगितले.
उपस्थितांना लोकन्यायालयाची संकल्पना पटवून देऊन सामंजस्याने कसे वाद मिटविता येतील याचे मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी एस. एन. बी. पी कॉलेजचे विद्यार्थी, नागरिक आणि वकील बांधव – भगिनी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले पाटील आणि सचिव ॲड. धनंजय कोकणे, महिला सचिव ॲड. मोनिका सचवाणी, ॲाडिटर ॲड. संदीप तापकीर, सदस्य ॲड. फारूख शेख, ॲड. दशरथ बावकर, ॲड. अस्मिता पिंगळे, ॲड. अयाज शेख यांनी केले. ॲड. मोनिका गाढवे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड.फारूख शेख यांनी आभार मानले.
सदर लोक अदालतीमध्ये दोन्ही न्यायालयात एकूण ३०१३ खटले निकाली निघाले; आणि एकूण रक्कम रुपये ४,४२,३२,७४८/- वसुली करण्यात आली.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम