लोहगड:
स्वच्छ भारत मिशन टप्पा २ अंतर्गत गड किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहीम लोहगडावर राबविण्यात आली.युनोस्कोने नामांकन केलेल्या लोहगड किल्ल्याची स्वच्छता मोहीम झाली. मावळ पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यावतीने फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाडे, मावळ शिक्षक प्रबोधन परिवार व हिरकणी शिक्षिका मैत्रीण ट्रेकिंग ग्रुपने ही मोहीम फत्ते केली
लोहगड गाव व किल्ला परिसराची संपूर्ण स्वच्छता केली. या स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, शिक्षण विस्ताराधिकारी शोभा वहिले यांनी केले.
केंद्रप्रमुख निर्मला काळे, सुनंदा दहीतुले, सुहास धस, सहदेव डोंबे, राजू भेगडे, मनोज भांगरे, संदीप कांबळे,तानाजी शिंदे, सुरेश पाटील, संतोष राणे, गोरक्ष जांभुळकर,शिवाजी जरग, स्मिता कांबळे अशा ८० शिक्षकांनी केले. युनेस्कोने नामांकन केलेल्या पुणे जिल्ह्यातील तीन किल्ल्यांपैकी लोहगड हा एक किल्ला आहे. पर्यटकांच्या आकर्षणाचा हाकेंद्रबिंदू आहे. अभेद्य तटबंदी असलेला आणि दैदीप्यमान इतिहास असलेला हा लोहगड किल्ला मावळ तालुक्याची शान आहे.
या किल्ल्याला जागतिक वारसा मिळवून देण्यासाठी फ्रेंड्स ग्रुप हिरकणी ग्रुप आणि मावळ शिक्षक प्रबोधन परिवार यांच्यामार्फत स्वच्छता मोहिमेत खारीचा वाटा उचलला. मावळ तालुक्यातील शिक्षकांनी सदर मोहिमेत भाग घेतला. लोहगड किल्ल्यावर शिवव्याख्याते सचिन ढोबळे यांचे व्याख्यान झाले. सूत्रसंचालन सुहास धस यांनी केले. उपस्थितांचे आभार राजू भेगडे आणि मनोज भांगरे यांनी मानले.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम