तळेगाव दाभाडे: नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये ‘इंटरनल स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनचे यशस्वी आयोजन नुकतेच करण्यात आले. या स्पर्धेमध्ये तीनशे हुन अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनच्या थीमनुसार विद्यार्थ्यांनी ५१ नाविन्यपूर्ण कल्पना मांडल्या.
या हॅकॅथॉनमध्ये इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या विभागातील विद्यार्थ्यांनी सायबर सिक्युरिटी, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य आणि खेळ, कृषी, ग्रामीण विकास आदी विविध विषयांवर काम केले आणि नवनवीन कल्पनांसह प्रतिकूल समस्यांवर उपाय सुचविले. प्रत्येक विषयामध्ये तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आधुनिकतेचा वापर करून प्रगतीचा मार्ग दाखवण्याचा प्रयन्त केला.
कार्यक्रमाचे उदघाटन नूतन अभियांत्रिकीचे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार यांच्या हस्ते केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. विलास देवतारे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. नितीन धवस उपस्थित होते. डॉ. जहागीरदार यांनी विद्यार्थ्यांना भारताच्या प्रगतीसाठी नवनवीन शोध आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहीत केले.
‘ शिक्षण घेत असताना जिथे कुठे तंत्रज्ञान विषयात कार्य कराल तिथे नाविन्याचा ध्यास घ्या आणि आनंदाने काम करा,’ असे उदगार डॉ. देवतारे यांनी बोलताना केले. डॉ. धवस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी दशेत आपली विचारसरणी सुधारण्यासाठी काही टिप्स सांगितल्या.
या स्पर्धेसाठी एसपीओसी म्हणून डॉ. विकास यादव यांनी काम पहिले. तर विविध आस्थापनातील तज्ज्ञ परीक्षक म्ह्णून लाभले. एनआयसीचे सीईओ मुजाहिद शेख, आयआयसी संयोजक डॉ. एम. के बिरादार, आयआयसी समन्वयक प्रा. नीलिमा बावणे , एनआयसी मॅनेजर अमन पनिया यांच्यासह विभागीय समन्वयक आयआयसी प्रा. काव्यश्री, प्रा. भाग्यश्री वऱ्हाडे, प्रा. महेश चिंचोले, प्रा. विवेक नागरगोजे, प्रा.डी.आर. जाधव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम