वडगाव मावळ: आंदर मावळात दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास आता नक्की कमी होईल.आज या विकासकामांना प्रारंभ करून भविष्यातल्या प्रगत मावळची मुहूर्तमेढ रोवली जात आहे,असे मत मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केले. 
आमदार शेळके यांच्या हस्ते आंदर मावळातील विविध विकासकामांचा श्रीगणेशा झाला. आंदर मावळातील माऊ पठार ते सटवाईवाडी रस्ता करणे, लहान पुलाचे बांधकाम करणे, डोंगरवाडी ते वडेश्वर धनगर पठार रस्ता सुधारणा करणे आणि सटवाईवाडीतील अंतर्गत रस्ते करणे अशा विविध विकासकामांचा समावेश यामध्ये आहे.
या विकासकामांचा भूमिपूजन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या रस्त्यांच्या कामासाठी सुमारे 10 कोटी 20 लाख रुपये निधी उपलब्ध केला आहे. या निधीतून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ झाला आहे. यामुळे लवकरच पठारावरील ग्रामस्थांची दळणवळणाची गैरसोय दूर होणार आहे. पाऊस काळात या गावांमधील नागरिकांना मावळातील इतर गावांशी संपर्क तुटत असे.या कामांमुळे भविष्यात हा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.
या भूमिपूजन समारंभास ज्येष्ठ नेते शांताराम लष्करी, नारायणराव ठाकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नंदकुमार खोत, रुपेश घोजगे, बाबूशेठ ओसवाल, संजीव असवले, देवाभाऊ गायकवाड, शिवराम शिंदे, स्वामी जगताप, निवृत्ती ठाकर, सरपंच छाया हेमाडे, शुभांगी दरेकर, ज्ञानेश्वर जगताप, वसुदेव लष्करी, सुरेखा शिंदे, रुपाली सुपे, हेमांगी खांडभोर, कुंदा मोरमारे, भरत लष्करी, ह.भ.प.दत्तात्रय महाराज हेमाडे,अनंता हेमाडे, एकनाथ  हेमाडे,लालाभाऊ हेमाडे, चंद्रकांत शिंदे, किरण हेमाडे, आंदर मावळातील आजी-माजी पदाधिकारी,सरपंच,सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!