वडगाव मावळ: साते ग्रामपंचायत सरपंच पदी संदीप दिनकर शिंदे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. मावळत्या सरपंच वर्षा नवघणे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणूक अधिकारी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.सहाय्यक म्हणून ग्रामसेवक अर्जुन गुडसुरकर यांनी काम पाहिले.
सरपंच पदासाठी संदिप शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जगताप यांनी जाहीर केले. याप्रसंगी उपसरपंच आम्रपाली मोरे ग्रामपंचायत सदस्य गणेश बो-हाडे, सखाराम काळोखे,.ऋषीनाथ आगळमे, .संत़ोष शिंदे, सौ.वर्षा नवघणे, सौ.आरती आगळमे, सौ.मिनाक्षी आगळमे, सौ.ज्योती आगळमे, सौ.श्रुती मोहिते आदी व साते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी कार्यकाळात सरपंच म्हणून ग्रामपंचायत हद्दितील मोहितेवाडी, ब्राह्मणवाडी, विनोदेवाडी या सर्व वाड्या – वस्त्यांसह गावचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे सरपंच श्री.संदिप शिंदे यांनी सांगितले.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम