पिंपरी:  स्काय चाईल्ड फाउंडेशन या विशेष मुलांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या वतीने विनाशुल्क व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २६ येथील गणेश तलावाजवळ संस्थेच्या कार्यालयात दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४ ते ०२ जानेवारी २०२५ या तीन महिन्यांच्या कालावधीत हे प्रशिक्षण देण्यात येईल. समाजातील चौदा वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या दिव्यांग मुली आणि महिला यांच्या अंगभूत सुप्त कौशल्याला वाव मिळवून देत त्यांच्यातील स्वावलंबनाची भावना वृद्धिंगत व्हावी हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे.
यामध्ये भिंतीवरील शोभिवंत वस्तू (वॉल हँगिंग), दारावरील तोरण, सुगंधी मेणबत्ती, सुगंधी साबण, सुगंधी उटणे, महिलांच्या पोशाखावरील कलाकुसर बनविणे अशा विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षणार्थींच्या जागा मर्यादित असल्याने इच्छुकांच्या पालकांनी ७५०७९९२४८८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर नोंदणी करावी, असे आवाहन  स्काय चाईल्ड फाउंडेशनच्या संस्थापिका सोनाली पलांडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!