वडगाव मावळ:
मावळ विधानसभा मतदारसंघातील मोरवे ग्रामपंचायत अंतर्गत कोळे चापेसर येथील विहित कागदपत्रांची पूर्तता झालेल्या ०७ आदिवासी समाजबांधवांना ‘शबरी घरकुल योजना अंतर्गत ‘ भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांच्या पुढाकाराने , जिओ टॅग फॉर्म भरून घेण्यात आले.
यामुळे , लवकरच , या आदिवासी समाजबांधवांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागा मार्फत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फु. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देण्यात येते. रविंद्र भेगडे यांच्या पुढाकाराने , या योजनेचा लाभ मावळ मधील ०७ आदिवासी समाजाच्या कुटुंबाला होणार आहे. याप्रसंगी , ग्रामपंचायत मोर्वे उपसरपंच प्रवीण गोणते ,येळसे उपसरपंच निलेश ठाकर ,आदिवासी प्रमुख गणेश वाल्हेकर ,अंकुश जांभूळकर आदी मान्यवर उपस्थित होते.