माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
लोणावळा: शंभर वर्षे पूर्ण झालेल्या लोणावळ्यातील जागतिक कीर्तीच्या कैवल्यधाम योग संस्थेतर्फे यंदाचे “स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
नॅशनल मेडिकल कमिशनचे चेअरमन डॉ. बी. एन. गंगाधर ,डॉ. राजीव कुमार ,डॉ. संप्रसाद विनोद यंदाच्या पुरस्काराचे मानकरी होते.
कार्यक्रमाची सुरुवात, राष्ट्रीय गीत आणि शांती पाठाने करण्यात आली. तत्पूर्वी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद ,कैवल्यधाम शताब्दी वर्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, डॉ. रणजीत सिंग भोगल, पुरस्कार्थी डॉ. बी. एन. गंगाधर, डॉ. राजीव कुमार आणि डॉ. संप्रसाद विनोद यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले.
कैवल्यधाम संस्थेचा अधिकारी वर्ग, योग महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच लोणावळ्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुसज्ज पोलीस यंत्रणा राबविण्यात आली होती. सुबोध तिवारी यांनी स्वागतपर भाषण केले.सुरेश प्रभू यांनी प्रमुख पाहुणे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा शाल, कैवल्यधाम संस्थेची शताब्दी वर्षाची मुद्रा आणि योग विषयक पुस्तके देऊन सन्मानित केले.
या तिन्ही पुरस्कार्थी यांचा संक्षिप्त स्वरुपात परिचय देऊन त्यांना भारताचे माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार दिले.कैवल्यधाम योग संस्थेचे संस्थापक स्वामी कुवल्यानंद यांची मूर्ती, कैवल्यधाम शताब्दी वर्षाची मुद्रा तसेच प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले. पुरस्कार्थीनी आपली मनोगते व्यक्त केली.सुरेश प्रभू यांनी योगाचे महत्व विशद केले.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारत हे योग विद्येचे प्रणेते आहेत. योगाचा प्रसार सा-या जगभर होत आहे.असे सांगून विदेशातील अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ममता बिष्ट यांनी केले.आभार प् डॉ. रणजीत सिंग भोगल यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शांती मंत्र आणि राष्ट्रीय गीताने करण्यात आली.
रामनाथ कोविंद १६ व १७ सप्टेंबर असे दोन दिवस कैवल्यधाम संस्थेत वास्तव्यास होते .या दरम्यान त्यांनी कैवल्यधाम संस्थेच्या संदिपानी लायब्ररी कैवल्यधाम ऐतिहासिक स्यालरी, शास्त्रीय अनुसंधान विभाग, कैवल्य विद्या निकेतन शाळा या विभागास भेटी दिल्या व माहिती जाणून घेतली. योगाभ्यासाचा अनुभव घेत कैवल्यधाम योग संस्थेचे संस्थापक परमपूज्य स्वामी कुवल्यानंद यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांनी केले होते.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस