पिंपरी:
संकल्प प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या गणपती दान आणि निर्माल्य दान उपक्रमास शहरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका ब प्रभाग आणि संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह व ब प्रभाग अधिकारी अमित पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली रिवर व्ह्यू घाट बिर्ला हॉस्पिटल रोड चिंचवडगाव येथे पाचव्या दिवसाच्या गणेश विसर्जनाच्या दिवशी 668 गणेश मूर्तींचे दान मिळाले .
शिवाय दोन टन निर्माल्य स्वीकारले.या उपक्रमात प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडी चिंचवड पुणे काॅलेजचे एन एस एस चे विद्यार्थी सहभागी झाले होते
या उपक्रमाचे संयोजन संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड,विश्वास राऊत ,संजीत पद्मन ,भरत शिंदे ,मनोहर कड ,कविता वाल्हे,अनुशा पै ,अरुण कळंबे रमेश भिसे,नंदकिशोर खंडागळे ,शब्बीर मुजावर ,पुजा संनके यांनी केले.
पिंपरी चिंचवड ब प्रभाग अभियंता राजकुमार सूर्यवंशी ,चेतन देसले रसूल शेख ,रमेश कपूरे ,प्रविण शेळके ,अनिल ढाले यांनी सहकार्य केले.
- मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर
- ले.डॉ.संतोष गोपाळे यांची दिल्ली येथे होणाऱ्या एनसीसी शिबिरासाठी महाराष्ट्र संघाचे मार्गदर्शक म्हणून निवड
- वडगाव मावळच्या न्यू इंग्लिश स्कूलचे चित्रकला स्पध्रेत यश
- अनुसया दत्तात्रय निंबळे यांचे निधन
- संक्रातीच्या निमित्ताने प्रशांत भागवत मित्र परिवाराच्या वतीने तिळगुळाचे वाटप