वडगाव मावळ: मावळ विधानसभा मतदारसंघ संघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस मधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची लक्षणे आहेत. कारण महायुतीतील भाजपने , ‘आमचं ठरलंय’ आणि ‘कमळ हाच आमचा उमेदवार’ अशी घोषणा देत संपूर्ण मावळ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. पवन मावळातून भाजपने ही साद घातली आहे.
मागील पंचवार्षिक निवडणूक सोडली तर , मावळ विधानसभेत अधिक काळ भारतीय जनता पार्टीचेच वर्चस्व राहिले आहे. सध्याचे विद्यमान आमदार भाजपशी बंडखोरी करूनच , राष्ट्रवादीवासी झाले होते. त्यामुळे भाजपची प्रचंड ताकत असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीचे वर्चस्व भाजपाला अमान्य आहे.
भाजपने कमळ चिन्ह घेऊन लढणार असल्याचे वेळोवेळी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. इतकेच काय विजयी संकल्प मेळावा घेऊन लढण्याचा नारा दिला. आता तर गाव भेट दौरा काढून कमळ हाच आमचा उमेदवार असा नारा द्यायला सुरुवात केली आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, प्रदेश भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष गणेश भेगडे ,निवडणूक प्रमुख भाजपा मावळ विधानसभा रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वाखाली व तालुकाध्यक्ष दत्तात्रय भाऊ गुंड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. प्रत्येक गावात जात , भाजप कार्यकर्ते जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधत , मूळ भाजप विचारांच्या नागरिकांना साद घालत आहे.भाजपने गावभेट दौऱ्यात ,चांदखेड ,कुसगाव ,आढले खु, दारुंब्रे,आढले बु सांगवडे , डोणे, गहुंजे ,गोडूंब्रे ,पुसाने ,पाचाणे , ओवळे , सांळुब्रे ,दिवड , शिरगाव या गावांना भेटी देऊन , ग्रामस्थांशी आणि मतदारांशी संवाद साधण्यात आला.याप्रसंगी माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, युवा मोर्चा अध्यक्ष नितीन मराठे, तालुका सरचिटणीस नितीन घोटकुले,अभिमन्यू शिंदे, प्रदेश युवा मोर्चा सचिव रघुवीर शेलार, भाजपा प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, प्रदेश भाजपा निमंत्रित सदस्य जितेंद्र बोत्रे, पुणे जिल्हा भाजपा भाजपा उपाध्यक्ष रामदास गाडे, वडगाव शहर भाजपा अध्यक्ष संभाजी म्हाळसकर, पुणे जिल्हा ओ.बी.सी. सेल अध्यक्ष दत्ता माळी, गणेश धानिवले,पुणे जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष किरण राक्षे, चांदखेड महागाव जिल्हा परिषद गट अध्यक्ष माऊली आडकर, माऊली ठाकर, बाबुलाल गराडे, रामभाऊ गोपाळे ,युवा वॉरियर्स अध्यक्ष प्रनेश नेवाळे, यांच्यासह भाजप पदाधिकारी , कार्यकर्ते , आजी-माजी सरपंच-उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य , विविध कार्यकारी विकास सोसायटी चेअरमन, संचालक व नागरिक , बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.