पिंपरी:  निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २५ मधील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ ही संस्था सुमारे ४१ वर्षांपासून पिंपरी – चिंचवड परिसरात प्रबोधनात्मक कार्य करीत असून शिक्षण, पर्यावरण, महिला सबलीकरण, सांस्कृतिक संवर्धन, सामाजिक प्रबोधन अशा वेगवेगळ्या आयामांसाठी सातत्याने विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवित आहे. गेल्या दोन वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून समाजातील अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्य रेषेखालील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शालेय फीसाठी आर्थिक मदत देण्यात येत आहे. शिक्षणाच्या किमान अधिकारापासून गरीब मुले वंचित राहू नयेत, यासाठी हा उपक्रम आहे. त्यासाठी मंडळाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक सहाय्य’ या योजनेंतर्गत गरजू विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबत स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयात सकाळी ९ ते १२ तसेच सायंकाळी ४ ते ८ या वेळेत अर्ज मिळतील.  अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ८४४६४२२९६५ अथवा दूरध्वनी क्रमांक ०२० २७६५९०१० वर संपर्क साधावा.

error: Content is protected !!