![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2024/09/img-20240901-wa00334911650559921949727-300x200.jpg)
लोणावळा – लोणावळा-खंडाळा शहरात ओला, उबर या ऑनलाईन बुकिंग घेणाऱ्या रिक्षा व टॅक्सी सेवा कायमस्वरुपी बंद होण्यासाठी आरटीओच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी,अशी सूचना मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केली.
उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत ओला-उबेर या ऑनलाइन टॅक्सी व रिक्षा सेवेला लोणावळा-खंडाळा शहरात व्यवसाय करण्यास बंदी घालण्याबाबत चर्चा झाली होती.त्या अनुषंगाने मावळचे आमदार सुनिल शेळके, पुणे जिल्हा परिवहन विभागाचे अधिकारी, लोणावळा शहर व ग्रामीण पोलीस अधिकारी, स्थानिक टॅक्सी चालक, प्रतिनिधी व आजी-माजी पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक लोणावळ्यात झाली.त्यात आमदार शेळके बोलत होते. लोणावळा शहरात लाखो पर्यटक दरवर्षी येत असतात.परंतु ऑनलाईन वाहतूक कंपन्यांमुळे स्थानिकांचा रोजगार हिरावून घेतला जातो.अजितदादांनी बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार ही वाहतूक सेवा लोणावळ्यात बंद झाली पाहिजे,अशी सर्वांची मागणी आहे. ऍग्रीगेटर परवान्यासाठी आवश्यक गोष्टींची व नियमांची पूर्तता न केल्यामुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने व जिल्हाधिकाऱ्यांनी ओला,उबेर यासारख्या कंपन्यांना परवाना नाकारला होता.त्याचप्रमाणे आता लोणावळा शहरात देखील ही वाहतूक कायमची बंद राहील याची काळजी आरटीओ अधिकाऱ्यांनी घ्यावी,अशी सूचना आमदार शेळके यांनी केली.
आमच्या स्थानिक भूमिपुत्रांचा हक्काचा रोजगार कोणी हिरावून घेणार नाही यासाठी आम्ही सर्वजण नेहमीच प्रयत्नशील आहोतच. पर्यटकांना उत्तम सेवा देण्यासाठी आमच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या टॅक्सी व रिक्षा सज्ज असतील,असे त्यांनी मनोगतात सांगितले.
या बैठकीस पुणे ग्रामीण परिवहन विभागाचे अधिकारी राहुल जाधव, प्रवीण भोसले, पोलीस निरीक्षक सुहास जगताप, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, किरण गायकवाड, देविदास कडू, माजी नगरसेवक नारायणभाऊ पाळेकर, निखिल कवीश्वर, मंजुताई वाघ, अरुण लाड,मुकेश परमार, संजय भोईर,बाबा ओव्हाळ,आशिष ठोंबरे, रवी पोटफोडे, भरत चिकणे, सनी पाळेकर,टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष संजय मावकर,योगेश गवळी तसेच शहरातील मान्यवर व टॅक्सी संघटनेचे सभासद उपस्थित होते.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम
![](file:///data/user/0/org.wordpress.android/cache/picsart_23-09-30_12-00-02-288(1)-214177654279141149893.jpg)
![](file:///data/user/0/org.wordpress.android/cache/picsart_24-04-01_21-21-59-5167734273296348518251.jpg)
![](file:///data/user/0/org.wordpress.android/cache/picsart_23-05-06_00-30-39-307(1)-224556417646616766536.jpg)
![](file:///data/user/0/org.wordpress.android/cache/picsart_22-09-02_21-12-10-3247332529270165285701.jpg)