
पिंपरी: संस्कार प्रतिष्ठान आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्राथमिक विद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आकुर्डी परिसरात पर्यावरणपूरक गणेश उत्सव जनजागृती अभियान राबविण्यात आले होते.
संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्राथमिक विद्यालय आकुर्डीचे प्राचार्य योगिता काळे यांनी संयोजन केले होते.गणेशत्सव व नवरात्र उत्सव काळात शाडू माती किंवा इको फ्रेंडली मूर्तीची स्थापना करून पर्यावरण पूरक सजावट करा,विसर्जनाच्या वेळी मूर्ती घरीच विसर्जन करा किंवा मूर्ती दान करा,निर्माल्य दान करा,मातीचा पुनर्वापर करा,पारंपरिक वाद्य संगीत वाजवा.
सजावटीसाठी थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर टाळा. रासायनिक रंगांचा वापर टाळा. असे आवाहन करण्यात आले. या अभियानात संजिद पद्मन वर्ग शिक्षिका वर्षा नलावडे वर्गशिक्षक प्रकाश कदम ,मनोज मेदनकर ,शबाना मनेर यांनी सहकार्य केले.
- रमजान ईद निमित्त इंदोरीत खजूर वाटप : प्रशांत भागवत युवा मंचाचा उपक्रम
- संत तुकाराम साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा – आमदार सुनील शेळके
- मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरात गुढीपाडवा व मराठी नववर्षाचं स्वागत भव्य शोभायात्रेने जल्लोषात साजरं!!
- नवीन वर्षाच्या स्वागताने रंगली रावेतनगरी…
- संगीताच्या अनाहत नादात श्रोते मंत्रमुग्ध
-187701403621072502237.jpg)


